टीम इंडियातील पाचजण खेळतात पब्जी

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (09:36 IST)
गुगल प्ले स्टोअरवर 70 मिलियनहून अधिक डाऊनलोड असलेला पब्जी हा सर्वात लोकप्रिय मल्टीप्लेअर गेम आहे. अन्य देशात नाही तर भारतात देखील हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे. पब्जीसारखे अनेक गेम याआधी आले पण त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली नव्हती. सर्व सामान्य लोक नाही तर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू हा गेम नियमितपणे खेळतात.

भारतीय क्रिकेट संघातील सपोर्ट स्टाफनी दिलेल्या माहितीनुसार काही भारतीय क्रिकेटपटू हा गेम नियमितपणे खेळतात. इतकच नव्हे तर त्यासाठी त्यांनी टॅब्स विकत घेतले आहेत आणि रिकाम्या वेळेत ते पब खेळतात. जाणून घेऊयात असे कोणते क्रिकेटपटू आहेत जे नियमितपणे पब्जी खेळतात.

पब्जी खेळण्यात आघाडीवर असलेला भारतीय क्रिकेटपटू म्हणजे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी होय. धोनीचे नाव या यादीत अव्वल स्थानी वाचून अनेकांना धक्का बसले. पण भारतीय संघात धोनी हा पहिला खेळाडू आहे ज्याने पब्जी डाऊनलोड केला.

आयपीएलच्या काळात केदार जाधवने या गेमबद्दल धोनीला सांगितले. त्यानंतर तो देखील हा गेम खेळू लागला. धोनी हा गेम अतिशय आक्रमकपणे खेळतो. पब खेळण्यासाठी धोनी, जाधव, चहल आणि धवन यांनी मिळून एक टीम तयार केली होती. हे सर्वजण जेवण झाल्यानंतर किंवा प्रवासात खेळायचे.

केदार जाधवमुळे पब्जी गेम भारतीय संघातील खेळाडूंना माहीत झाला. यागेममध्ये केदार हा टीम लिडर मानला जातो. कारण त्याला हा गेम सर्वात जास्त माहीत आहे. केदारमुळेच मोहमम्द शमीने देखील हा गेम खेळण्यास सुरूवात केली. केदार जाधव पाठोपाठ जर सर्वात जास्तवेळ पब कोण खेळत असेल तर तो म्हणजे फिरकीपटू युजवेंद्र चहल होय. चहल त्याच्या इंस्टाग्रामवर गेम जिंकल्याच पोस्ट शेअर करत असतो. चहल अनेक वेळा पब्जी खेळताना दिसला आहे. चहल आणि केदार जाधव एकाच टीमकडून पब्जी खेळतात.

मोहमम्द शमीला सर्व जण टॅब प्लेअर या नावाने बोलवतात. शमी तच घरातील सदस्यांसोबत हा गेम खेळायचा. जाधवच्या सांगण्यावरून तो टीममधील खेळाडूंसोबत पब्जी खेळतो. यासाठी त्याने टॅब विकत घेतला आहे.
भारतीय संघातील गब्बर शिखर धवन देखील पब्जी खेळतो. धवन संघातील खेळाडूंसोबत नाही तर पत्नी सोबत पब्जी गेम खेळतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती