एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

शनिवार, 27 एप्रिल 2024 (13:38 IST)
लोकसभा निवडणूक 2024 : एक देखील मुस्लिमला तिकीट दिले नाही म्हणून एका मोठ्या नेत्याने राजीनामा दिला आहे. ते म्हणालेत की, महाराष्ट्र काँग्रेस अभियान समितीमधून राजीनामा देत आहे. 
 
काँग्रेस पार्टीला मुसलमान वर्गाकडून फक्त मत पाहिजे आहे. त्यांना कँडिडेट बनवू इच्छित नाही. हे आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे एक नेता शीर्ष नेतृत्व वर लावले आहे. मुहम्मद आरिफ नसीम खान यांनी काँग्रेस पार्टीव्दारा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मुस्लिम नेत्याला तिकीट दिले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पार्टीच्या अभियान समिती मधून राजीनामा दिला आहे. 
 
मुहम्मद आरिफ नसीम खान यांनी पार्टी प्रमुख मल्लिकार्जुन खडगे यांना पत्र लिहून त्यात म्हणालेत की, ते लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार नाही. कारण, विपक्षी महाविकास आघाडी(एमवीए)गटाने एक देखील मुस्लिम उमेद्वार मैदानात उतरवले नाही. 
 
महाराष्ट्राच्या पूर्व मंत्रीने लिहले की, "महाराष्ट्राच्या एकूण 48 लोकसभा जागांमधून एमवीएने एक पण मुस्लिम उमेद्वारला तिकीट दिले नाही." ते म्हणाले की, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मुस्लिम संघठन, नेते आणि पार्टी कार्यकर्ता अशा लावून बसले होते की, काँग्रेस अप्लसंख्यांक समुदाय मधून कमीत कमी एक उमेद्वारला तिकीट मिळेल. पण दुर्भाग्य असे काहीच झाले नाही. 
 
ते म्हणालेत की, सर्व पार्टीचे नेता आणि कार्यकर्ता त्यांना विचारात आहे, "काँग्रेसला मुस्लिमांचे मत पाहिजे, पण उमेद्वार का नाही." खडगे यांना पत्रामध्ये त्यांनी लिहले की,ते महाराष्ट्र काँग्रेस अभियान समिती मधून राजीनामा देत आहे. काँग्रेसने महाराष्ट्राच्या 48 लोकसभा जागांमधून 17 जागांसाठी शिवसेना(युबीटी)आणि एनसीपी(शरद पवार)सोबत महायुतीमध्ये निवडणूक लढत आहे ते विपक्ष महाविकास आघाडी(एमवीए)चे घटक आहे. 
 
मुहम्मद आरिफ नसीम खान यांना मुंबई उत्तर मध्य मधून तिकीटाची अपेक्षा होती पण पार्टीने या जागेमधून वर्षा गायकवाड यांना चिन्ह दिले. मुहम्मद आरिफ नसीम खान म्हणाले असे वाटते की, काँग्रेस सामावेशीताची आपली अनेक वेळ पासून चालत येणारी विचारधारेपासून भटकली आहे. ते म्हणालेत की त्यांना कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटतांना त्यांना दुर्लक्षित का केले. 

Edited By- Dhanashri Naik   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती