..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज

गुरूवार, 26 मार्च 2020 (10:48 IST)
ज्या वेगाने देशात करोनाचा फैलाव होतो आहे तो वेग तसाच राहिला तर 15 मे पर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 13 लाखापर्यंत जाऊ शकते असा धक्कादायक अंदाज COVID- 19 या टीमने व्यक्त केला आहे. 
 
या टीममध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला एका अहवालात ही धक्कादायक शक्यता व्यक्त केली आहे.
 
भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच कठोर पावलं उचलली असली तरी देशातील करोनाग्रस्तांची नेमकी संख्या किती हे अद्याप नीट समजू शकलेलं नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते असंही या टीमने म्हटलं आहे. या अहवालानुसार, भारतात करोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती