राज्यात अनेक ठिकाणी जसे पुणे, नाशिक, कोल्हापुरात मुसळधार पाऊस

बुधवार, 25 मार्च 2020 (17:31 IST)
देशात झपाट्याने वातावरणात बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा सध्याच्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र हा गारवा टेन्शन वाढवणारा ठरू नये, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे राहणार आहेत. त्यात आजच पुण्यात सिंहगड, कोथरूड आणि हडपसर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाल्याने पुण्यातील उष्णतेचा पारा कमी झाला आहे. एकूणच पुणे शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली असून पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी बरसल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती