सुखद बातमी: राज्यातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य करोनामुक्त

बुधवार, 25 मार्च 2020 (11:24 IST)
कोरोनाच्या दहशतीमुळे त्रस्त जनतेशी एक दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य करोनामुक्त झाले आहे.
 
गुढी पाडव्याच्या शुभ प्रसंगी ही बातमी खरंच मनाला सुख देणारी आहे की राज्यातील या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे काही वेळातच आपल्या घरी जाणार आहेत. 
 
तसेच आणखी 8 करोना रुग्णही बरे झाल्याची बातमी असून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याअर्थी कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचे संकेतही मिळत आहे हे यश डॉक्टरांचे असून अशी बातमी घरात बसलेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती