कोल्हापूरमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला

मंगळवार, 24 मार्च 2020 (15:21 IST)
देशामध्ये कोरोनाव्हायरसचं संकट फैलावलं असल्यामुळे अनेक राज्यामध्ये संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमिवर सगळ्या जिल्ह्यांच्या सीमादेखील सील करण्यात आल्या आहे. कोल्हापूरमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे.
 
मुंबईकर आणि पुणेकरांसाठी अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सगळे लोक सुट्ट्या लागल्या म्हणून गावी जाण्यासाठी निघाले आहेत अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गाव पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.
 
गावात येणारे तीन रस्ते बंद केले आहेत. मोठे दगड टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर कोल्हापूरमधील शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पुलही बंद करण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती