लक्षवेधी ठरत आहे रोहिणी खडसे यांचा 'तो' फोटो

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:10 IST)
Face book
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे.  
 
एकीकडे खडसे राजीनाम्याची पत्रकार परिषद घेत असताना त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी यांनी आपल्या फेसबुक पेजवर फोटो अपलोड करत होत्या. घड्याळ लावतानाचे हे फोटो अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झाले. केवळ १५ मिनिटांमध्ये ४ हजार लाईक्स आणि साडेचारशे कॉमेंट्स पडल्या. खडसे यांच्यासोबत आपणही राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं रोहिणी यांनी जाहीर केले आहे.
 
रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती