वाचा, खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवार काय म्हणाले

शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (16:20 IST)
“राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 
 
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे स्वतःच्याच पक्षावर नाराज असल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती