होय, माझ्या सल्ल्यानेच माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश - एकनाथ खडसे

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (15:12 IST)
भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण खडसेंच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाडवी म्हणाले आणि खडसेंनीही त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली.
 
राष्ट्रवादीत प्रवेशावेळी पाडवी म्हणाले, "ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."
 
पाडवींच्या या वक्तव्याबाबत माध्यमांनी एकनाथ खडसेंना विचारलं असता, खडसेंनीही ते मान्य केलं. तसंच, अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असंही खडसे म्हणाले.
 
एकीकडे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अशी वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखीच उधाण आलं आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती