खडसे यांनी 'ती' शक्यता फेटाळली, काय बोलले वाचा

गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:40 IST)
भाजप नेतृत्वावर टीका करणारे आणि प्रचंड नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. मात्र, खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा खडसे यांनी फेटाळली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बैठकीत खडसे यांच्याबाबत चर्चाच झाली नसल्याची राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नाराज खडसे यांनी भाजपवर टीका करताना मी माझा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून ते पक्ष सोडणार, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार, असेही वृत्त होते. मात्र, राष्ट्रवादीकडून याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. 
 
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. खडसे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने त्यांच्या नाराजीचा विचार करावा, असेही ते म्हणाले. जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे जयंत पाटील म्हणाले.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती