मनसे विचारते 'केम छो वरळी...'

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (17:25 IST)
मुंबईत झालेल्या सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील वरळीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. 
 
शिवसेना नेते आदित्य यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. 'केम छो वरळी...' असा खोचक सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. 
 
संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओतून, पावसाचं पाणी घरात शिरल्याने काय परिस्थिती उद्भवली आहे, याचा अंदाज येतो आहे. घरातील सामानाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती