‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत मनसेकडून मुख्यमंत्र्यांना विचारणा

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:29 IST)
शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेल्या वचनांची आठवण करुन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे महापालिकेसमोर गुरुवारी थाळीनाद आंदोलन केले. दरम्यान या गाण्यासह एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत मनसेच्या अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही प्रश्नांची विचारणा केल्याचे दिसतेय. यामध्ये नवे धरण, सेंट्रल पार्क, मालमत्ता कर सूट असे अनेक आश्वासनं कधी पूर्ण करणार? याची विचारणा करताना क्या हुआ तेरा वादा? असा प्रश्न मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
 
“पाचशे स्क्वेअर फुटाहून कमी जागेत राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द करणार, शिवसेनाप्रमुखांच्या नावे सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देणार.. फ्री, फ्री, फ्री” असा साडेतीन वर्षांआधी उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती