ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही : अजित पवार

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (10:09 IST)
“ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पार्थ पवार यांच्या  भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
पुढे त्यांनी सांगितलं की, “जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे” असं स्पष्ट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती