लातूरला हवे स्वतंत्र विद्यापीठ

मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (09:53 IST)
लातुरला विद्यापिठाचे उपकेंद्र असताना स्वतंत्र विद्यापिठाची गरज काय? असा प्रश्न ‘आम्ही लातुरकर’ने केलेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने पडतो. शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. विद्यापीठ जिल्हा स्तरावर व्हायला हवे, लातुरात शिक्षण उप संचालक कार्यालय आहे. तीन जिल्ह्यासाठी विभागीय शिक्षण मंडळ आहे. एकट्या सोलापुरसाठी विद्यापीठ होऊ शकते मग लातुरसाठी का नको? लातूर जिल्ह्यात नांदेडच्या तुलनेत सर्वाधिक महाविद्यालये आहेत. इथे गुणवत्ता आहे, विद्यार्थ्यांच्या संशोधकीय वृत्तीला वाव मिळाला पाहिजे त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे अशी भूमिका सामाजिक नेते उदय गवारे, आम्ही लातुरकरचे समन्वयक प्रदीप गंगणे यांनी मांडली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदेही उपस्थित होते. स्वतंत्र विद्यापिठासाठी आवश्यक त्या सगळ्या चळवळी करा, आमचा त्याला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. ३०-३१ तारखेला मुख्यमंत्री लातुरात आहेत. त्यांनी या विद्यापिठाची घोषणा करावी, आम्हाला हार घालायची संधी द्यावी असं आंदोलक म्हणतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती