मतिमंद युवकास शोधायला फेसबुक आले कामी

सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (15:40 IST)
दावणगीर ता. देगलूर येथून सुधाकर टोके काही दिवसांपूर्वी हरवला होता. मतीमंद असलेला सुधाकर टोके लातूर शहरात अत्यंत वाईट अवस्थेत भटकताना बाभळगावच्या आपत्कालीन सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे संचालक आंबाजी सगट यांना आढळला. त्यांनी त्याची विचारपूस करुन प्रशिक्षण केंद्रावर आणले. त्याची शश्रुषा केली. त्याचा योग्यरित्या सांभाळ करीत नातलगांचा शोध घेणंही चालू ठेवलं. व ही सर्व गोष्ट त्यांनी फेसबुकवर फोटो सह टाकली, हे कळाल्यावर सुधाकरच्या नातलगांनी सगट यांच्याशी संपर्क साधला. सुधाकरचा भाऊ भास्कर टोके या प्रशिक्षण केंद्रावर आला. त्याने ओळख पटवली. प्रशिक्षण केंद्राने सुधाकरला भास्करच्या हवाली केले. तेरा तारखेपासून सुधाकर याच ठिकाणी रहात होता. तिथल्या सर्वांशी त्याचे नाते तयार झाले होते. त्याला पाठवताना आम्हाला दु:ख होते आहे असे कमांडो गोविंद टोंपे यांनी सांगितले. या केंद्राने आजवर अशा शेकडो हतबल व्यक्तींना आधार दिला आहे. कुठल्याही संकट समयी तातडीने मदत करण्यात हे केंद्र अग्रेसर असते. सुधाकरचा शोध लागण्यात फेसबुक कामी आले हे विशेष.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती