मुंबईत डेंग्यूचा कहर वाढला

मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:44 IST)
स्वाइन फ्लूमुळे मुंबईचे आरोग्य बिघडत असतांनाच डेंग्यूचाही कहर वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे 44 रुग्ण आढळले असून, गेल्यावर्षी याच कालावधीत 19 रुग्णांची नोंद झाली.
 
वास्तविक डेंग्यूची लागण पावसाळ्यात होत असते, परंतु वातावरणातील बदलांमुळे उन्हाळ्यातही या आजाराचा फैलाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. डेंग्यूप्रमाणेच लेप्टोस्पायरोसीसही वाढत असून मार्च अखेरपर्यंत 17 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी  हा आकडा अवघा 5 होता. आरोग्य आणि स्वच्छता विभागातील 40 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती