कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांनी घेतला ‘हा’ निर्णय

शनिवार, 27 मार्च 2021 (08:43 IST)
सध्या राज्यभरात कोरोनाचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या चांगलिच वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल. असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे. पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत तर दुपारच्या सत्राचे कामकाज दुपारी दीड ते सायंकाळी चार यावेळेत चालणार आहे. दि.२६ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत हा बदल असणार आहे. वकील, पक्षकार अथवा साक्षीदार गैरहजर असले, तरी न्यायाधीशांनी प्रतिकूल आदेश करु नयेत.
 
जे वकील, पक्षकार, साक्षीदार अथवा आरोपी यांची न्यायालयासमोर उपस्थिती आवश्यक आहे, त्यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रदेश दिला जाणार आहे. असेही आदेशात म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक असलेले सर्व नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती