पिंपरी चिंचवडमध्ये ११ सराईत गुन्हेगार एकाच दिवशी ‘तडीपार’

शनिवार, 27 मार्च 2021 (08:28 IST)
पिंपरी चिंचवड शहरातील ११ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकाच दिवशी तडीपार केले आहे. गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ७२ गुन्हेगारांना तडीपार केले होते. कारवाईची मोहीम यावर्षी देखील सुरु असून यापूर्वी १३ तर आणखी ११ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, चाकण, आळंदी, दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, चिंचवड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हेगाराचा समावेश आहे.
 
भोसरी पोलीस ठाण्यातील शकील कासीम शेख (वय २४, रा. कासारवाडी), अमोल शांताराम नितोने (वय २०, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय २२, रा. भोसरी), चाकण पोलीस ठाण्यातील ओंकार मछिंद्र झगडे (वय २४, रा. चाकण), रोहन महेंद्र धोगरे (वय २२, रा. चाकण), आळंदी पोलीस ठाण्यातील गौरव धर्मराज भूमकर (वय २३, रा. चिंबळी, ता खेड), दिगंबर उर्फ डिग्या विठ्ठल कदम (वय ३०, रा. आळंदी), दिघी पोलीस ठाण्यातील राहुल एकनाथ धनवडे (वय २१, रा. च-होली बु.), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. बोपखेल), चिंचवड पोलीस ठाण्यातील वीरेंद्र उर्फ बेन्द्या भोलेनाथ सोनी (वय २०, रा. वाल्हेकरवाडी), एमआयडीसी भोसरी मधील एक आरोपी अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
या गुन्हेगारांना २६ मार्च २०२१ पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यावर्षी आतापर्यंत २४ गुन्हेगारांना तडीपार केले आहे.
 
सन २०२१ मध्ये मोक्का अंतर्गत सात गुन्हेगारी टोळ्यांमधील ४७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. आणखी तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील ३२ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. चालू वर्षात आतापर्यंत तडीपार व मोक्काअंतर्गत १०३ सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती