गोव्यातील प्रसिद्ध शिगमोत्सव रद्द करण्याचा निर्णय

शुक्रवार, 26 मार्च 2021 (20:59 IST)
राज्यातील प्रसिद्ध असा शिगमोत्सव अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. गोव्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने गोव्यातील प्रसिद्ध शिगमोत्सव रद्द करण्याचा निर्णय  घेतला आहे. राज्यात किमान नऊ ठिकाणी शिगमोत्वस व्हावा म्हणून मगोपचे नेते आमदार सुदीन ढवळीकर प्रयत्नशील होते. यानंतर सुदीन ढवळीकर यांनी विधानसभेत याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना कोरोनामुळे शिगमोत्सव रद्द करीत असल्याचे सांगितले. 
तसेच गोवा राज्य पर्यटन महामंडळ कार्निवलप्रमाणे तीन ठिकाणांचे शिगमोत्सव करण्याच्या तयारीत होते. तर विवाहसोहळा आणि इतर उत्सवही आता निर्बंध घालून आयोजित केले पाहिजेत असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती