लाखो रुपये असलेला भिकारी, सापडले पैसे आणि फिक्स डिपॉझिट

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:16 IST)
मुंबईतल्या गोवंडीत एका भिकाऱ्याकडे लाखो रुपये सापडले आहेत. या भिकाऱ्याकडे दीड लाखांची चिल्लर तर पावणे नऊ लाखांच्या फिक्स डिपॉझिट सापडल्या आहेत. पिरबीचंद आझाद असे भिकाऱ्नायाचे नाव असून त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्याच्या घरचा जेव्हा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा त्याच्या घरात चिल्लरची पोती सापडली. ही चिल्लर दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शिवाय त्याच्या नावे बँकेत ८ लाख ७७ हजारांच्या फिक्स डिपॉझिटही असल्याचं समोर आलं आहे.
 
पीरबीचंद आझाद एकटाच राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून घराचा तपास सुरु असताना त्याच्याकडे सिनियर सिटीझन कार्ड, आधार आणि पॅन कार्डही सापडले आहे. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती