शेतकऱ्यांनो, भाजपवाल्यांना दारातही उभे करु नका – शरद पवार

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:06 IST)
भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, भाजपाचे नेते तुमच्या दारात मते मागायला येतील. त्यांना तुमच्या दारातही उभे करु नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित अहमदनगर येथील सभेत शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका केली. 
 
या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले असे म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांवरही टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती