दसऱ्याच्या निमित्ताने देवीला सोन्याची साडी

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:11 IST)
पुण्यातल्या सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे. एका भाविकाने ही साडी अर्पण केली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या दरम्यान देवीला ही साडी नेसवली जाते.

दसऱ्याच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या अंगावरील ही साडी आणखीनच खुलून दिसत आहे. देवीला नेसविण्यात आलेल्या साडीचे वजन साडेतेरा किलो इतके आहे. देवीचे हे रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती