राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, नाशिक पोलिसांना आला फोन

रविवार, 3 मार्च 2024 (11:03 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून धमकी देणारा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हा हल्ला होईल असा नाशिक पोलिसांना फोन आला होता, पोलिसांनी त्वरित फोन करण्याऱ्या व्यक्तीची माहिती घेतली.  हा फोन माहात्मानगर परिसरात राहणाऱ्या  एका माथेफिरू  व्यक्तीने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान मानसिक तणावातून हा फोन केल्याची कबुली या व्यक्तीने  यांनी दिली आहे. या व्यक्तीला अनेक वर्षापासून दारूचे व्यसन आहे. पोलसांनी त्यांना जेव्हा ताब्यात घेतले तेव्हाची जोशी दारूच्या नशेत होते.
 
राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी
याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता. राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता. तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक आजाराने त्रस्त आहे.

राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ
तसेच गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे. व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रा
दरम्यान, महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे. मालेगाव येथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून, नाशिकमार्गे ठाणे येथे यात्रेचा समारोप केला जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत 15 राज्यांमधून जाणार आहे. यामध्ये 110 जिल्हे, सुमारे 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 66 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

राहुल गांधी घेणार काळाराम मंदिराचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानेवारीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. मोदी आणि ठकारे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा करण्यात आली होती. आता काँग्रेस नेते राहुल गांधी हेदेखील येत्या काही दिवसात  काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती