झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार, या घटनेत सात ते आठ जणांचा सहभाग

शनिवार, 2 मार्च 2024 (13:44 IST)
झारखंडमधील दुमका येथे एका विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पर्यटक स्पेनमधून आली आहे. रांचीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुमहाट येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. महिला पर्यटक तिच्या साथीदारासोबत येथे एका तंबूत राहत असल्याचे सांगण्यात आले.
 
जारमुंडी विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्रीच घडली. अधिक माहिती नंतर दिली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान या घटनेत सात ते आठ तरुणांचा सहभाग असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यातील तिघांना अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे स्पॅनिश जोडपे बांगलादेशातून दुचाकीवरून झारखंडमधील दुमका येथे पोहोचले होते. स्पॅनिश महिला (28) आणि तिचा साथीदार दिवसा बाईक चालवायला गेले होते. रात्री शहरापासून दूर शांत ठिकाणी तंबू लावून झोपी गेले. काही वेळाने महिला टैंटमधून बाहेर आली असता सहा-सात जणांनी तिला पकडून काही अंतरावर नेऊन दुष्कर्म केला. नंतर सर्वांनी तेथून पळ काढला.
 
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना झारखंडमध्ये अशा वेळी घडली जेव्हा पंतप्रधान मोदी स्वतः राज्यात होते. झारखंडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांनी चंपाई सोरेन सरकारलाही धारेवर धरले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती