दोन बहिणींसोबत रक्षाबंधनासाठी जात असलेल्या भावाचा मांजा गळ्यात अडकल्याने मृत्यू

दोन बहिणींसोबत स्कूटरवर मावस बहिणीकडे राखीचा सण साजरा करण्यासाठी जात असलेल्या भावाचा गळा चायनीज मांजा अडकल्याने कापला गेला. दोघी बहिणी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या परंतू तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
पोलिसांप्रमाणे 22 वर्षीय मानव शर्मा आपल्या कुटुंबासह दिल्लीच्या रोहिणी सेक्टर 1 मध्ये राहत होता. तो खाजगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने आपल्या दोन्ही बहिणींकडून हातावर राखी बांधवली. नंतर ते आपल्या हरिनगर येथे राहणार्‍या मावस बहिणीकडे राखी बांधवण्यासाठी जात होते. दोघी बहिणींनी सोबत जाण्याचा म्हटले म्हणून तिघं स्कूटरने निघाले.
 
दुपारी सुमारे एक वाजता ते पश्चिम विहार स्थित एलिवेटेड फ्लायओव्हरवर पोहचले तेव्हा एक झेप घेत असलेल्या पतंगाचा मांजा त्याचा गळ्यात अडकला. गळ्यात मांजा अडकल्यावर मानवच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा मानवाने स्कूटरची स्पीड कमी केली आणि साईडला जाऊन थांबवली परंतू तो लगेच बेशुद्ध होऊन पडला. त्याची हालत बघून दोघी बहिणी घाबरून गेल्या आणि नंतर लोकांची मदत घेऊन त्यांनी भावाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मानव दोघी बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून मानवच कुटुंबाकडे लक्ष देत होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती