प्रेयसीच्या आत्महत्येची खोटी बातमी ऐकून‍ प्रियकराने फाशी लावली

मस्ती-विनोद थट्टा करणे वेगळी गोष्ट आहे परंतू मजाक करण्याची एका मर्यादा असते आणि ती ओलांडल्यास गंमत जीवघेणे ठरू शकते. अशाच एक प्रकार दिल्लीच्या कल्याणपुरी भागात घडला आहे. जेथे एका तरुणाला त्याच्या प्रेयसीची आत्महत्येची खोटी बातमी देण्यात आली. आणि तरुणाने कुठलीही अधिक चौकशी करता स्वत: फाशी लावून घेतली. 
 
हैराण करणारी बाब म्हणजे ज्या मुलीसाठी त्यांनी फाशी घेतली ती आपल्या कुटुंबासोबत सकुशल आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेले नाही.
 
पोलिसाप्रमाणे 21 वर्षीय दीपक स्वत:च्या कुटुंबासह मेन रोड, खिचडीपुरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि तीन बहिणी आहेत. दीपक गुरुग्राममध्ये ओला कॅब 
 
चालवत होता. दीपकच्या मेहुण्यांनी सांगितले की तो सुमारे तीन वर्षापासून मथुरा रहिवासी तरुणीच्या प्रेमात होता. दोघांना विवाह करायचा होता परंतू मुलीच्या घरच्यांना हे मंजूर नव्हते. काही दिवसांपूर्वीच मुलीवाल्यांनी दीपकला मुलीपासून दूर राहा अशी सूचना देखील दिली होती. कुटुंबाच्या दबावामुळे तरुणीने दीपकशी बोलणे बंद केले होते.
 
सोमवारी संध्याकाळी अचानक कोणी दीपकला कॉल लावून प्रेयसीने मथुरामध्ये आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केल्याची सूचना दिली. या बातमीमुळे दीपक परेशान झाला, त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी रात्री 11 च्या सुमारास त्याने आपल्या खोलीतील पंख्याला लटकून फाशी घेतली. प्रकरण लक्षात येत्याक्षणी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती