8 वर्षाच्या मुलाने केला दीड वर्षांच्या मुलाचा खून, म्हणाला भावाचा सूड उगवला

मंगळवार, 30 एप्रिल 2019 (17:07 IST)
काय खेळणी खेळण्याच्या वयात बदला घेण्यासाठी खून केलं जाऊ शकतं? हे वाचून आपणही हैराण व्हाल की दक्षिण दिल्लीच्या फतेहपुर बेरी येथे अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे 8 वर्षाच्या एका मुलाने दीड वर्षाच्या मुलाची हत्या केली.
 
पोलिसांप्रमाणे दीड वर्षाचा चिमुकला आलोक रविवार रात्रीपासून गायब होता. आलोकच्या आईची झोप पहाटे चार वाजता उघडली तेव्हा आलोक बिछान्यावर नव्हता. शोध घेतल्यावर सकाळी सुमारे सात वाजता मुलाचा मृतदेह एका घाणेरड्या गटारीत सापडला.
 
आलोकच्या डोळ्या आणि चेहर्‍यावर जखमा होत्या. या दरम्यान पोलिसांना कळले की शेजारी राहणारा 8 वर्षाचा एक आणखी मुलगा गायब आहे. पोलिसांना तपासले की आलोक गायब झाला तेव्हा तो देखील गायब होता.
 
चौकशीत आरोपी मुलाने सांगितले की त्याने आलोकला उचलून अनेकदा पाण्याच्या टाकीत बुडवले. नंतर त्याला गटारीत फेकून दिले. कारण विचारल्यावर तो म्हणाला की आलोकच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी गच्चीवर त्याच्या भावावर मारहाण केली होती ज्यामुळे भावाला सूज आली होती आणि रागाच्या भरात 8 वर्षाच्या मुलाने दीड वर्षाच्या चिमुरड्याची हत्या केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती