दिल्लीची हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीत 10 हजाराला ड्रग्स डोज, 5 हजाराला पेग

उत्पादन शुल्क विभाग आणि महरौली पोलिसांनी शनिवार रात्री छतरपूर एक्सटेंशनच्या एका कॅफेमध्ये एका रेव्ह पार्टीवर छापा मारला. मुख्य आयोजकासह 8 लोकांना अटक केले गेले आहे. पार्टीत परदेशातील व हरियाणाहून आयात अवैध दारू व्यतिरिक्त चरस आणि मॉर्फिन ड्रग्स सर्व्ह केली जात होती. कॅफेला सील करण्यात आले आहे.
 
या प्रकरणात उघडकीस आले आहे येथे दारू आणि ड्रग्स खूप महागात विकली जात होती. येथे एका पेगची किंमत 5000 रुपये तर ड्रग्जच्या एका डोजची किंमत 10000 रुपये होती.
 
अधिकार्‍यांप्रमाणे रेव्ह पार्टीत हाय प्रोफाइल कुटुंबातील मुले सामील होते. पार्टीत सामील होण्यासाठी भारी रक्कम खर्च करावी लागते. पार्टीत दारूसाठी भारी रक्कम चुकवावी लागत होती. आयोजक कोणत्याही ग्राहकावर पूर्ण विश्वास झाल्यावर किंवा परिचित असल्यावरच ड्रग्स सर्व्ह करत होता. आरोपी मॉर्फिन ड्रग्स कोणाकडून घेत होता याचा तपास सुरू आहे.
 
माहितीप्रमाणे आरोपी आधी कॅश जमा करून घेत होता नंतर बँडच्या रूपात कूपन देत होता. त्या बँडच्या आधारावर ड्रग्स आणि दारू सर्व्ह केली जात होती. 
 
पोलिसांची टीम तेथे पोहचल्यावर आयोजक पुलकित रस्तोगीकडून पार्टीसाठी लायसेंस दाखवायला सांगितले गेले. आयोजकाने लायसेंस असल्याचे म्हटले परंतू दाखवले नाही. अधिकार्‍यांनी आयोजकांकडे लायसेंस नसल्याचे दावा केला आहे. 
 
पार्टी फ्रेंच डीजे परफॉर्मिंग इन दिल्ली या नावाने आयोजित करण्यात आली होती. आयोजक पुलकितच्या खिशातून डार्क ब्राउन रंगच्या पिशवीत गुंडाळलेल्या 17 गोळ्या आणि एका प्लास्टिक पाउचमध्ये 20 गुलाबी रंगाच्या गोळ्या जप्त केल्या गेल्या आहेत. या गोळ्या चरस आणि मॉर्फिनच्या असल्याचे सांगितले जात आहे.
 
चौकशीत बाहेर उभ्या असलेल्या लँड क्रूझरगाडीतून विदेशी आणि हरियाणा ब्रँडची दारू आणि 1.39 लाख नगदी रक्कम जप्त करण्यात आली. तसेच होंडा सिटी गाडीतून 12 दारूंच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती