घरीच करोना चाचणी करण्याची सुविधा, हे आहे संपर्क क्रमांक

गुरूवार, 26 मार्च 2020 (12:59 IST)
मुंबई महापालिकेने आता मुंबईकरांच्या घरीच जाऊन करोनाविषयक चाचणी करण्यासाठी पाच खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे. 
 
सबर्बन डायग्नोस्टिक्स, थायरोकेअर, मेट्रोपोलीस, सर एच एन रिलायन्स, एसआरएल लॅब या पाच खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी संपर्क साधताच त्यांच्या घरी जाऊन करोनाविषयक चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या साठी नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहे.
 
शुल्क
या पाचही प्रयोगशाळांना संपर्क साधताच यामधील तज्ज्ञ संबंधितांच्या घरी पोहोचतील आणि त्यांची चाचणी करतील. शासनाच्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना एका चाचणीसाठी जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये शुल्क आकारता येणार आहे.
 
चाचणीचा आधार
ही चाचणी करण्यासाठी नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांचे शिफारसपत्र आवश्यक आहे. 
 
पत्ता
• Thyrocare Technologies Limited, D37/1, TTC MIDC, Turbhe, Navi Mumbai
• Suburban Diagnostics (India) Pvt. Ltd., 306, 307/T, 3rd Floor, Sunshine Blvd., Andheri (W), Mumbai
• Metropolis Healthcare Ltd, Unit No. 409-416, 4th Floor, Commercial Building-1, Kohinoor Mall, Mumbai
• Sir H.N. Reliance Foundation Hospital and Research Centre, Molecular Medicine, Reliance Life Sciences Pvt. Ltd., R-282, TTC Industrial Area, Rabale, Navi Mumbai
• SRL Limited, Prime Square Building, Plot No 1, Gaiwadi Industrial Estate, SV Road, Goregaon, Mumbai
 
संपर्क क्रमांक
• थायरोकेअर : 9702466333
• सबर्बन डायग्नोस्टिक्स : 022-61700019
• मेट्रोपोलीस: 8422801801
• सर एच एन रिलायन्स : 9820043966
• एसआरएल लॅब : 022-6780801111

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती