ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

गुरूवार, 26 मार्च 2020 (12:08 IST)
मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 वर्षात निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सांताक्रूजला एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1950-60चं दशक त्यांनी गाजवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. अखेर काल त्यांचं निधन झालं. उडन खटोला, मेरे मेहबूब, दाग, अमर, बरसात हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती