कावळा आणि साप

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (13:40 IST)
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचं जोडपं घरटं बनवून राहतं होते. त्याच झाडाखाली खाली एक साप बिळात राहत होता. तो कावळ्याची नजर चुकवून त्या कावळ्याचा पिलांना खाऊन टाकायचा. प्रत्येक वेळी असेच घडायचे की कावळ्याने अंडी दिली की साप खाऊन टाकायचा. ते दोघे फार दुखी होते. पण सापाशी कशे काय लढायचे हाच विचार जणू दोघे करीत असे. 
 
त्या झाडाच्या जवळच एक कोल्हा राहतं होता. कावळ्याने त्याचा कडून मदत मागण्याचे ठरविले आणि तो त्याकडे मदत मागण्यास गेला. आणि आपण माझी मदत करणार का असे विचारले. कावळ्याने कोल्ह्याला सांगितले की दरवेळी हा साप आमच्या पिलांना खाऊन टाकतो. आपण या सापाला ठार मारण्यात आम्हाला काही उपाय सांगू शकता का ? आपले फार उपकार होतील. 
 
कोल्हा म्हणाला मित्रा कधी कधी इवलेसे जीव देखील असे काही करतात की मोठे प्राणी देखील काही करू शकत नाही. कोल्ह्याने त्याला एक उपाय सांगितला. तो कावळ्याला म्हणाला की तू शेजारच्या राज्यात जा आणि राजाची एखादी मौल्यवान वस्तू घेऊन ये आणि त्या सापाचा बिळात टाकून दे. त्याने असेच केले तो जवळच्या राजाच्या राज्यात गेला आणि त्याचे हार घेऊन पळाला. राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतं त्याचा मागे येऊ लागले. ठरल्याप्रमाणे त्याने हार सापाच्या बिलावर टाकले. कावळ्याचा वास येतातच साप लगेच बिळातून बाहेर आला, तो पर्यंत त्या राजाचे सैनिक देखील त्याचा मागे मागे त्या झाडापर्यंत आले होते. त्यांनी 
 
त्या सापाला बघतातच त्याला ठेचून मारून टाकले. अश्या प्रकारे त्या कावळ्याचा जोडप्याला त्या दुष्ट सापापासून सुटका मिळते आणि ते दोघे मग आनंदात राहू लागतात.
 
तात्पर्य : शक्ती पेक्षा युक्तीच श्रेष्ठ

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती