बोध कथा : लपलेली संपत्ती

शनिवार, 2 जानेवारी 2021 (11:48 IST)
एक शेतकऱ्याने आयुष्यभर परिश्रम केले आणि अफाट संपत्ती मिळविली. त्याला चार मुले होती. ते चार ही कामचुकार आणि आळशी होते. शेतकऱ्याची इच्छा होती की त्या मुलांनी देखील खूप परिश्रम करावे आणि संपत्ती मिळवावी. तो आपल्या मुलांना खूप समजावयाचा पण त्याच्या समजावयाचा काहीही उपयोग नव्हता. हे बघून त्याला खूप वाईट वाटत होते. तो म्हातारा झाला आणि त्याला वाटू लागले की आता आपले आयुष्य कमी आहे तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना बोलवून त्यांना म्हटले - बाळांनो ! आता माझे आयुष्य फार कमी आहे पण मी मरण्याचा पूर्वी तुम्हाला काही गुपित सांगू इच्छितो. आपल्या शेतात खूप संपत्ती गाडून ठेवलेली आहे. माझ्या मृत्यू नंतर तुम्ही चारी भाऊ मिळून शेताला खणून त्यामधील संपत्ती काढून वाटून घ्या. 
 
मुलांनी विचार केला की 'वा वडिलांच्या पश्चात आपल्याला मेहनत करण्याची गरज पडणार नाही आपले पुढील आयुष्य देखील आनंदाने जातील'. 
 
एके दिवशी तो शेतकरी मरण पावतो. त्याचा पश्चात ते चौघे भाऊ शेत खणायला घेतात आणि संपूर्ण शेत खणतात, पण त्यांना संपत्ती कोठेही सापडत नाही ते आपल्या वडिलांना खूप वाईट बोलतात. आता पुढे काय करावे ? हा प्रश्न चौघांच्या पुढे येतो. ते आपसात विचार करतात की आता आपण हे शेत खणले आहे तर या मध्ये द्राक्षाचे बियाणे पेरावे. शेत चांगल्या प्रकारे खणले होते त्या मुळे पीक देखील चांगले आले. द्राक्षाला बहर आला त्यांनी ते द्राक्षे विकले त्यामुळे त्यांना खूप पैसे मिळाले. 
 
आता त्या मुलांना आपल्या वडिलांच्या बोलण्याचे काय अर्थ आहे हे समजले. त्या दिवस नंतर त्यांनी मेहनत करण्याचा संकल्प घेतला, कारण मेहनत केल्यावर जी संपत्ती त्यांना मिळाली होती त्यामुळे ते खूप आनंदी झाले होते.
 
तात्पर्य : आळस माणसाला नेहमी कामचुकार बनवतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती