तीन प्रश्न - अकबर बिरबल कथा

शनिवार, 26 डिसेंबर 2020 (14:22 IST)
महाराज अकबर हे बिरबलच्या हज़रजबाबीचे मोठे प्रश्नसंक होते. म्हणून त्यांच्या राज्यसभेचे इतर मंत्री बिरबलाशी द्वेष ठेवायचे. त्यापैकी एक मंत्री होता ज्याला महामंत्री बनायचे होते. त्याने बिरबलाच्या विरोधात एक कट रचला. त्याला माहित होते की जो पर्यंत बिरबल या दरबारात सल्लागार म्हणून आहे त्याची ही इच्छा कधी ही पूर्ण होऊ शकत नाही. 
 
एके दिवशी अकबर ने बिरबलाच्या हज़रजबाबीचे कौतुक साऱ्या दरबाऱ्यात केले. हे ऐकून मंत्र्याला खूप राग आला. त्यांनी महाराज अकबरांना म्हटले की 'महाराज जर माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर बिरबलाने दिले तर मी त्याची बुद्धिमत्ता स्वीकारेल आणि असे झाले नाही तर हे सिद्ध करेन की तो एक महाराजांचा चापलूस आहे. अकबराला माहित होते की बिरबल नक्कीच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देईल. म्हणून त्यांनी त्या मंत्र्याची गोष्ट मान्य केली.
 
त्या मंत्र्यांचे तीन प्रश्न होते - 
या आकाशात किती तारे आहे?
पृथ्वीचे केंद्र कुठे आहे?
संपूर्ण जगात किती स्त्री आणि किती पुरुष आहे ?
 
अकबर यांनी ताबडतोब बिरबलाला या प्रश्नांचे उत्तर देण्यास सांगितले आणि अट घातली की जर बिरबल या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसेल तर त्याने हे मुख्य सल्लागार पद सोडावे. 
 
बिरबल म्हणाले - 'महाराज ऐका' 
पहिले प्रश्न - बिरबलाने एक मेंढी मागविली आणि म्हणाले की महाराज या मेंढीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढेच आकाशात तारे आहे. मित्रा तू हे केस मोजून घे आणि स्वतःची खात्री करून घे, बिरबलने मंत्र्याकडे हसून उत्तर दिले.
 
दुसरे प्रश्न - बिरबलाने जमिनीवर एक रेष ओढली आणि काही गणना करून एक लोखंडाची छड मागविली आणि एका ठिकाणी गाढून दिले आणि महाराजांना म्हणाले की 'महाराज या ठिकाणीच पृथ्वीचे केंद्र आहे, आपण तपासून बघावे.' महाराज म्हणाले की आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या.
 
आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे खूप अवघड आहे. कारण या जगात काही असे लोक आहे जे ना तर स्त्री वर्गात येतात आणि ना तर पुरुष वर्गात येतात. त्या मधील तर काही आपल्या दरबाऱ्यांत देखील आहे जसे की हे मंत्री. महाराज जर आपण ह्यांना मृत्यू दंड दिला तर मी पुरुष आणि स्त्रियांची अचूक संख्या सांगू शकतो. बिरबलाचे हे उत्तर ऐकून मंत्र्याला थरकाप उडाला आणि महाराजला म्हणू लागला की महाराज 'मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे. मी बिरबलाच्या चातुर्याला सहजपणे स्वीकारतो.
 
महाराज नेहमी प्रमाणे बिरबलकडे बघून हसू लागले आणि तो मंत्री त्या दरबारातून बाहेर निघून गेला. पुन्हा एकदा अकबराने बिरबलाच्या चातुर्याचे कौतुक केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती