कोरोना काळात मुलांची प्रतिकारक शक्ती अशी वाढवा

शुक्रवार, 26 मार्च 2021 (18:23 IST)
रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यावर मुलंच काय कोणीही आजारी होतो. लहान बाळांसह ही समस्या आवर्जून होते. या वयात मुलं त्यांना काय होत आहे ते देखील सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत पालक आणि पाल्य दोघे ही त्रासात असतात. या काळात बाळांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ नये या साठी विशेष काळजी घ्यावी लागते. या साठी काय करावयाचे आहे जाणून घ्या.
 
1 मुलांच्या झोपेची काळजी घ्या -मुलांचे दात निघतात तेव्हा ते खूप त्रासलेले असतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही. या मुळे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्ती  वर परिणाम पडतो. शक्य असल्यास प्रयत्न करा की मुलांची झोप आठ ते दहा तासाची व्हावी. 
 
2 मुलांना व्हिटॅमिन सी द्यावे- व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांसाठी फळांचे सेवन फायदेशीर आहे त्यांना फळांचा रस किंवा ज्यूस द्यावा. द्राक्ष,संत्री,खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. उकडलेला बटाटा देखील मुलांना देऊ शकतो. 
 
3 स्तनपान- बाळ आईचे दूध पीत असल्यास नियमितपणे मुलांना स्तनपान करावे.जे बाळ आईचे दूध पितात ते कमी आजारी पडतात. आईच्या दुधात अँटीबॉडी,प्रोबायोटिक्स,प्रथिन,वसा,साखर,इत्यादी आढळतात, जे मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. बाळ जर स्तनपान करत नाही तर चिकित्सकांचा सल्ला घ्यावा.
 
4 लसीकरणाच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका - लहान मुलांच्या कोणत्याही कामात दुर्लक्ष होऊ नये, विशेषतः लसीकरणाच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच रोग प्रतिकारक शक्ती वर होतो. त्यांचा लसीकरणाची योग्य काळजी घ्यावी. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती