महाराष्ट्रात कोरोना मध्ये खासगी कार्यालयात काम करण्यासाठी निर्बंध वाढले.

शुक्रवार, 19 मार्च 2021 (19:51 IST)
सध्या देशात कोरोना विषाणूचा साथीचा आजार वाढत आहे. शुक्रवारी संसर्गग्रस्त राज्यात महाराष्ट्रात शुक्रवारी सरकारने 31 मार्चपर्यंत नवीन निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, सर्व चित्रपटगृहे आणि सभागृह केवळ 50 टक्के क्षमतेसह कार्य करतील. सर्व खाजगी कार्यालये देखील 50 टक्के क्षमतेसह कार्य करतील.मास्क वापरणे अनिवार्य असेल. 
 
महाराष्ट्र सरकारच्या मते, एखादे कार्यालय किंवा नाटक थिएटर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास,ते साथीच्या कालावधीसाठी बंद केले जाऊ शकतात. तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या विभागप्रमुखांना आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसेच उत्पादन क्षेत्र 100 टक्के संख्येसह कार्य करू शकतात. या व्यतिरिक्त असेही म्हटले आहे की ज्या लोकांनी मास्क लावले नाही, अशा लोकांना प्रवेश देऊ नये. 
 
महाराष्ट्र सरकारने लावलेल्या नव्या निर्बंधानुसार स्क्रिनींगमध्ये तापमान योग्य आढळल्यासच कोणत्याही कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. तसेच सेनेटाईझरचा वापर देखील पूर्वी प्रमाणेच होईल याची खबरदारी घ्यावी. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती