कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खासगी रुग्णालयात बेड राखीव ठेवणार

शनिवार, 20 मार्च 2021 (08:04 IST)
पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाकडून खाट उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानूसार शहरातील 40 खासगी हॉस्पिटलचे दोन हजार  800 खाट तयार ठेवण्यात येत आहे. त्याकरिता आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे. तसेच घरकुलचे कोविड केअर सेंटरही सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
 
शहरातील अनेक कोविड रुग्णांना सौम्य लक्षणे आढळत आहेत. त्या रुग्णांना होम आयसोलेशनला प्राधान्य दिले आहे. तर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. लक्षणे विरहित रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. त्या रुग्णांना सीसीसी सेंटरमध्ये शिफ्ट केले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती