भूतबाधा दूर करण्यासाठी 10 सोपे उपाय

1. ॐ किंवा रुद्राक्ष मंत्रित केलेलं लॉकेट गळ्यात घालावे. घराबाहेर एका त्रिशूळामध्ये ॐ चे प्रतीक लावून दारावर लावावे. कपाळावर चंदन, केशर किंवा अंगारा लावावा. हातात रक्षासूत्र बांधून ठेवावे.
 
2. दिवाळीच्या दिवशी साजुक तुपाचा दिवा लावून काजळ तयार करावे. या काजळाने वाईट नजर नाही लागतं.
 
3. घरात रात्रीच्या जेवण्यानंतर आणि झोपायला जाण्यापूर्वी देवघरात किंवा घरातील एखाद्या पवि‍त्र स्थळावर चांदीच्या वाटीत कापूर आणि लवंग जाळत ठेवावी. याने आकस्मिक, शारीरिक, दैविक व भौतिक संकटांपासून मुक्ती मिळते.
 
4. भूत पळवण्यासाठी पुष्य नक्षत्रात धतूर्‍याचं झाड जडासहित उखडून घरातील गार्डनच्या जमिनीत या प्रकारे दाबावा की जड वरील  भागास असावी आणि झाड जमिनीच्या आत. याने प्रेतबाधा दूर होते.
5. प्रेतबाधा निवारण्यासाठी या हनुमान मंत्राचा पाच वेळ्या जाप करावा - ऊँ ऐं ह्रीं श्रीं ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ऊँ नमो भगवते महाबल पराक्रमाय भूत-प्रेत पिशाच-शाकिनी-डाकिनी-यक्षणी-पूतना-मारी-महामारी, यक्ष राक्षस भैरव बेताल ग्रह राक्षसादिकम्‌ क्षणेन हन हन भंजय भंजय मारय मारय शिक्षय शिक्षय महामारेश्वर रुद्रावतार हुं फट् स्वाहा।
 
6. अशोकाचे सात पाने मंदिरात ठेवून पूजा करावी. ते वाळ्यावर नवीन पाने ठेवावी आणि जुनी पाने पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी.  नियमितपणे ही क्रिया केल्याने प्रेतबाधा आणि नजर दोषाहून मुक्ती मिळेल.
 
7. बाधित कार्य पूर्ण करण्यासाठी व नजर दोष दूर करण्यासाठी एक वर्ष गणपतीला रोज एक सुपारी आणि एक वाटी तांदूळाचे दान करावे.
8. दररोज देवीपुढे सकाळ-संध्याकाळ दोन सुवासिक उदबत्त्या लावून घराची आणि शरीराची रक्षा करण्याची प्रार्थना करायला हवी.
 
9. हनुमान चालीसा आणि गजेंद्र मोक्षाचा पाठ करून मारुतीच्या मंदिरात हनुमंताला चोला चढवून त्यांचा शृंगार करावा.
 
10. भीती दूर करण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी बजरंग बाणाचा पाठ सुरू करावा.
 
हे सोपे उपाय करून भूत बाधापासून मुक्ती प्राप्त होऊ शकते यासाठी टोटके करण्याची गरज नाही.

वेबदुनिया वर वाचा