पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका

रविवार, 29 मार्च 2020 (13:29 IST)
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे नागरिकांचं घरबसल्या मनोरंजन व्हावं यासाठी केंद्र सरकारने गाजलेल्या रामायण आणि महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका पुन्हा प्रसारित करावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य करत झी मराठी वाहिनीने ही मालिका पुन्हा एकदा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका झी मराठी वाहिनीवर 30 मार्चपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुपारी 4 वाजता ही मालिका प्रसारित होईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती