कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

रविवार, 29 मार्च 2020 (08:00 IST)
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अभिनेता अक्षकुमारने 25 कोटींची मदत जाहीर केली आहे.

अक्षकुमारने टि्वट करत सांगितले आहे की, आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचे आहे ते सगळे केले पाहिजे. मी 25 कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती