केंद्राने 42 कोटी गरिबांना 53,248 कोटींची केली मदत

गुरूवार, 4 जून 2020 (10:41 IST)
लॉकडाउनमुळे केंद्र सरकारने आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या लोकांना मदत केल्याची माहिती जाहीर केली. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून 42 कोटी गरीब लोकांना 53 हजार 248 कोटी इतकी मदत करण्यात आली आहे. 
 
कर्मचारी भविष्य भविष्य निधी संघटनेतील 16.1 सदस्यांनी ईपीएफओ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्याचा फायदा घेतला. या सदस्यांनी 4 हजार 725 कोटी रुपये  पैसे काढल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले. या शिवाय 59.23 लाख कर्मचार्यांेच्या खात्यात 895.09 कोटी रुपये जमा केले गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती