हुंडाई व्हेन्यू चे बुकिंग सुरु भारतासाठी तयार केलेले खास दहा फिचर्स कारमध्ये असणार

सोमवार, 6 मे 2019 (16:29 IST)
हुंडाई व्हेन्यू चे बुकिंग सुरु  झाले आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने देशाच्या ड्रायविंग आणि रस्त्या प्रमाणे एकरूप होतील त्यांची मदत होईल असे खास दहा फीचर्स गाडीत अंर्तभूत केले आहे. त्यामुळे गाडीला बुकिंग साठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Hyundai Venue ही गाडी देशात 33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असणार असे कंपनी म्हणत आहे. या गाडीत 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये  देखील आहेत. Hyundai Venue कार मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  
 
ही कार चार व्हेरिअंट आणि तीन इंजिनच्या पर्यायांसह उपलब्ध असणार आहे. अद्याप व्हेरिअंट्सबाबत अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. या SUV मध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर नॅचरली अॅस्पायरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.4-लिटर डिझेल इंजिन मिळेल. थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनासह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रांसमिशन मिळेल, तर 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.4-लिटर डिझेल इंजिनमध्ये अनुक्रमे 5 आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. 8 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असण्याची शक्यता आहे.
 
विशेषतः भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या फीचर्समध्ये ड्रायव्हिंग इंफॉर्मेशन/ बिहेवियर, डेस्टिनेशन शेअरिंग, रिअल टाइम व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल लोकेशन शेअरिंग, जिओ-फेंस अलर्ट, स्पीड अलर्ट, टाइम फेंसिंग अलर्ट, वॉलेट अलर्ट, आयडल अलर्ट आणि व्हॉइस रिकग्निशन या फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.देशात ही कार मारुती सुझुकी विटारा, फोर्ड इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा XUV300 यांसारख्या कारसोबत स्पर्धा करणार  आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती