1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट गोल्ड, सोनेरी संधी साधून घ्या

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी असा या शुभ दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी सोन्याची खूप विक्री होते परंतू सोन्याची किंमत वाढलेली असली तर लोकांचे आकर्षण कमी होतं. पण अशात आपल्याला अशी संधी मिळाली की केवळ एक रुपायात 24 कॅरेट सोनं खरेदी करु शकता तर... नक्कीच आपण या बद्दल जाणून घेण्यात उत्सुक असाल.
 
Paytm ने खास ऑफर सुरु केली आहे. यात केवळ 1 रुपयात 24 कॅरेट सोनं खरेदी करता येणं शक्य आहे. पेटीएमवर 1 रुपया ते 1.50 लाखपर्यंत सोनं खरेदी करता येईल. पेटीएमवर सोनं खरेदी करण्यासाठी पैशांमध्ये आणि ग्राममध्ये असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी कोणता पर्याय निवडून आपण खरेदी करु शकता. 
 
येथे आपण एक रुपयात (0.0003 ग्राम) 24 कॅरेटचं सोनं खरेदी करु शकतात. तुम्ही खरेदी केलेलं सोनं MATC–PMP या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. तसेच खरेदी केलेलं सोनं त्याचठिकाणी तुम्ही लगेच विकू देखील शकता. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो. 
 
यात 1, 2, 5, 10 आणि 20 ग्रॅम सोन्याची नाणी आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती