सोने झालं स्वस्त, जागतिक बाजारात भाव उतरला

मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (17:05 IST)
शेअर बाजारातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने सोने दरात 0.6 टक्क्याची घसरण झाली आहे. कमॉडीटी बाजारात सोन्याचा भाव 40 हजार 455 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीचा भाव 46032 रुपये आहे. यात 0.4 टक्के घसरण झाली.
 
मागील चार सत्रात सोने 700 रुपयांनी वधारले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सावरल्याने सराफा बाजारात परिणाम झाला. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 71.23 वर ट्रेड करत होता. 
 
जागतिक कमॉडीटी बाजारात सोने प्रती औंस 1570.98 डॉलरवर स्थिर आहे. चांदीचा भाव 17.75 डॉलर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती