सोन्याच्या दरात 150 रुपये वाढ

शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (10:07 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी आल्यामुळे देशांतर्गत बाजारात गुरूवारी सोने दरात 150 रुपांनी वाढ झाली तर चांदीचे दर 140 रुपांनी वाढले. गेल्या दोन दिवसाच्या सोनेचांदीच्या   घसरणीनंतर दर पुन्हा पूर्ववत येण्याची अपेक्षा बाजारपेठेत व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर प्रति 28.34 ग्रॅमला 1560 डॉलर तर चांदी दर प्रति 28.34 ग्रॅमला 17.70 डॉलर इतके झाले आहे.
 
दिल्लीच्या सराफ बाजारात 99.9 टक्के शुध्द सोने प्रतिदहा ग्रॅमला 41 हजार 19 रुपये झाले. गुरूवारी हे सोने दीडशे रुपयांनी महागले. बुधवारी सोनाचा दर 40 हजार 871 रुपये होता. गुरुवारी औद्योगित मागणी वाढल्याने चांदीचे दर 140 रुपयांनी महाग होऊन ते आता प्रतिकिलो 46 हजार 881 रुपये झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती