सोन्याचे दर ऐतिहासिक पातळीवर

भारतात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं बोललं जात आहे. शेअर बाजाराच्या घसरणीमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर १,१५५ रुपयांनी वाढला. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव  १,१९८ रुपयांनी वाढला आहे. 
 
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४३,२२८ रुपये प्रति दहा ग्रॅमनंतर, तो वाढून आता ४४,३८३ प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणे चांदीचा दरही ४६,५३१ रुपयांवरुन, ४७,७२९ रुपये प्रति किलोग्रॅमवर झाला आहे. 
 
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत व्याजदरात घट आणि कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या दहशतीमुळे गुंतवणूकदार सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूकदारांना प्राधान्य देत आहेत. या कारणामुळे सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती