मेकअप सामान खराब झाले असल्यास अशा पद्धतीने वापरा

बुधवार, 31 मार्च 2021 (08:40 IST)
बऱ्याच वेळा काही स्त्रिया मेकअपचे सामान एक्स्पायर झाल्यावर फेकून   देतात.आपण ते सामान फेकून न देता अशा प्रकारे वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* लिपस्टिक - लिपस्टिक वेळोवेळी बदलत राहावी .एक्स्पायर झाल्यावर लिपस्टिक आपण लिपबाम म्हणून देखील वापरू शकता. या साठी लिपस्टिक गरम करून घ्या. जेणे करून त्यातील बेक्टेरिया नाहीसे होतील. नंतर हे लिपस्टिक एखाद्या पेट्रोलियम जेली मध्ये मिसळून लीप बाम म्हणून वापरावे. 
 
* आय शॅडो - जुने झालेल्या आयशॅडोचा वापर आपण नेलपॉलिश म्हणून देखील करू शकता. एका पारदर्शक नेलपेंटमध्ये आयशॅडोचे पिगमेंट मिसळा आणि नेलपेंट चा वापर करा. 
 
* फेस ऑइल -फेस ऑइल फेकून न देता या मध्ये साखर मिसळून स्क्रब म्हणून वापरू शकता. आपल्या गुडघ्या जवळची त्वचा किंवा कोपर काळे झाले असल्यास होममेड स्क्रब म्हणून आपण हे वापरू शकता. 
 
* लीप बाम - लीप बाम खराब झाले असल्यास फेकून  न देता नखाच्या भोवती कोरड्या त्वचे वर याला लावल्याने त्वचा मऊ होते. तसेच पॅन्ट ची झिप खराब झाली असल्यास याचा वापर करू शकतो. 
 
* स्किन टोनर- रसायनयुक्त स्किन टोनरचा वापर ते एक्सपायर झाल्यावर करू नये. स्किन टोनर मध्ये अल्कोहोल असत. याचा वापर आपणं काच,ग्लास,किंवा मोबाईल स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकता.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती