होळीला भांगेचा नशा उतरवण्यासाठी घरगुती उपाय

शनिवार, 7 मार्च 2020 (12:37 IST)
होळीच्या सणाला मस्तीमध्ये ग्लासच्या ग्लास भांग रिचवणाऱ्यांसाठी भांग उतरवणे अनेकदा कठिण जातं. यासाठी काही सोपे उपाय आहेत जाणून घ्या घरगुती उपाय -

या प्रकारे उतरेल भांगेचा नशा
1. आपण जास्त प्रमाणात भांगेचं सेवन केलं नसल्यास भाजलेले चणे खाऊन नशा उतरेल. पण गोड पदार्थ खाणे टाळावे.
 
2. जर भांगेचा नशा अधिक झाला असेल तर तुरीची कच्ची डाळ वाटून पाण्यात घोळून घ्यावी आणि याचे सेवन करावे.
 
3. भांग उतरावी म्हणून आंबट पदार्थ खाणे उत्तम पर्याय आहे. यासाठी आपण संत्रा, लिंबू, ताक, दही किंवा चिंच पना तयार करून सेवन करू शकता.
 
4. या व्यतिरिक्त मोहरीचं तेल कोमट करून एक किंवा दोन थेंब दोन्ही कानात घालावं.
 
5. अनेक लोक यावर उपाय म्हणून तुपाचं सेवन करतात. यासाठी शुद्ध तुपाचं अधिक प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे ज्याने भांगेचा नशा उतरवणे सोपं जातं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती