उन्हाळ्यामध्ये लावा पॉटेटो फेसपॅक, त्वचा सजीव दिसू लागेल

मंगळवार, 30 मार्च 2021 (09:26 IST)
उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी कच्च्या बटाट्याचा फेसपॅक फायदेशीर ठरेल. याने त्वचेवरील काळे डाग देखील नाहीसे होतील. हा पॅक आपण आठवड्यातून एकदा लावू शकता.
 
याप्रकारे तयार करा
दोन चमचे बटाट्याचा किस करुन त्यात एक चमचा चंदन पावडण आणि एक चमाच गुलाबपाणी घाला. पॅक तयार करुन चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चेहरा धुऊन घ्या.
 
उजळ त्वचेसाठी बटाट्याचा फेसपॅक
बटाट्याच्या रस काढून त्यात मध मिसळा. हे मिश्रण फेटून घ्या. चेहरा आणि मानेवर लावा. 10- 15 मिनिटं असेच राहू द्या नंतर धुऊन घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा करता येईल.
 
बटाटा त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंटच्या स्वरुपात कार्य करते. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. कच्च्या बटाट्याच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिंगची समस्या दूर होते. याने चेहऱ्यावरील गेलेली चमक परत येईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती