वॅक्सिंग करताना जळजळ आणि पुरळ येत असल्यास या टिप्स अवलंबवा

गुरूवार, 25 मार्च 2021 (17:46 IST)
वॅक्सिंग शरीराच्या अवांछित केसांपासून मुक्त करण्याचा एक सर्वात प्रचलित आणि चांगला मार्ग मानला जातो. वॅक्सिंग दरम्यान केस मुळापासून खेचले जातात, म्हणूनच एक वेदनादायक अनुभव देखील असतो. बर्‍याच वेळा त्याचे दुष्परिणामही दिसतात. अनेकांना वॅक्सिंग केल्यावर खाज येणं,त्वचा कोरडी होणं आणि पुरळ देखील येतात. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या.  
 
* त्वचा संवेदनशील असल्यास सर्वप्रथम पॅचटेस्ट करा. नंतर वॅक्स निवडा.  
 
* वॅक्सिंग केल्यावर मॉइश्चरायझर लावून मॉलिश करा. या मुळे जळजळ आणि लालसरपणा कामी होईल. 
 
* वॅक्सिंग केल्यावर गरम पाण्याचा वापर करू नका.
 
* वॅक्सिंग केल्यावर 12 तासापर्यंत साबण ,परफ्युम किंवा मेकअप वापरू नका. 
 
* वॅक्सिंग केल्यावर लगेच उन्हात निघू नका.
 
* वॅक्सिंग सेशन दरम्यान किमान एक महिन्याचे अंतर ठेवा. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती