2018 मधील दुसरे चंद्र ग्रहण

वर्ष 2018 मध्ये दोन चंद्र ग्रहण घटित होतील. यात पहिला चंद्र 31 जानेवारी 2018ला दिसणार आहे आणि दुसरा चंद्र ग्रहण 27 -28 जुलै 2018ला दिसेल. हे दोन्ही पूर्ण चंद्र ग्रहण असतील आणि भारतसमेत इतर देशांमध्ये देखील दिसतील. भारतात दृश्यता असल्यामुळे यांचे धार्मिक सूतक मान्य होतील.  
 
दोन्ही चंद्र ग्रहणांचे विवरण या प्रकारे आहे -
 
2018 मध्ये पहिला चंद्र ग्रहण
दिनाँक : 31 जानेवारी 2018
वेळ : 17:57:56 ते 20:41:10 वाजेपर्यंत  
ग्रहणाचा प्रकार : पूर्ण
दृश्यता : भारत, उत्तर पूर्वी युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर पश्चमी आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, उत्तर पश्चमी साउथ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, आर्कटिक, अंटार्क्टिका
 
सूतक
सूतक प्रारंभ 07:07:10 वाजे पासून  
सूतक समाप्त 20:41:10 वाजे पर्यंत  
 
2018 मध्ये दुसरा चंद्र ग्रहण 
 
दिनांक : 27-28 जुलै 2018
वेळ : 23:56:26 ते 03:48:59 वाजेपर्यंत
ग्रहणाचे प्रकार : पूर्ण
दृश्यता : भारत, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तरी अमेरिका चे दक्षिणी हिस्से, साऊथ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्कटिका
 
सूतक
सूतक प्रारंभ 27 जुलै 2018ला 12:27:26 वाजेपासून  
सूतक समाप्त 28 जुलै 2018ला 03:48:59 पर्यंत  
 
ग्रहणात सूतक कालाचे महत्त्व
हिंदू धर्मात सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दरम्यान काही कार्यांना वर्जित मानण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रहणाच्या दरम्यान सूतक किंवा सूतक काल एक असा वेळ असतो, जेव्हा काही काम करण्याची मनाई असते. कारण सुतकाचा हा वेळ अशुभ मानण्यात येतो. सामान्यत: सूर्य व चंद्र ग्रहण लागण्याच्या काही वेळा अगोदर सुतक काल सुरू होतो आणि ग्रहणाच्या समाप्तीनंतर स्नान केल्याने सुतक काल समाप्त होतो. पण वृद्ध, मूल आणि रुग्णांवर ग्रहणाचे सुतक मान्य होत नाही.  
 
ग्रहणात वर्जित कार्य
कुठले ही नवीन कार्य करणे वर्जित आहे  
सुतकाच्या दरम्यान भोजन तयार करणे आणि जेवण करणे देखील वर्जित असत.     
मल-मूत्र आणि शौच करू नये.  
देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीच्या पौधांना स्पर्श करू नये.  
दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये.  
 
ग्रहणात करा हे उपाय
ध्यान, भजन, ईश्वराची आराधना आणि व्यायाम करा.  
सूर्य व चंद्राशी निगडित मंत्रांचे उच्चारण करा.  
ग्रहण समाप्तीनंतर घराच्या शुद्धीकरणासाठी गंगाजल जरूर शिंपडावे.  
ग्रहण समाप्त झाल्यानंतर अंघोळकरून देवांना अंघोळ घालून पूजा करावी.  
सुतक काल समाप्त झाल्यानंतर ताजे भोजन तयार करावे.  
सुतक कालच्या आधी तयार भोजनाला फेकू नव्हे, बलकी त्यात तुळशीचे पान घालून भोजनाला शुद्ध करावे.  
 
ग्रहणात गर्भवती महिलांनी या गोष्टींकडे लक्ष ठेवावे  
ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना विशेष सावधगिरी बाळगायला पाहिजे. या दरम्यान गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्याआधी ग्रहण बघू नये. ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना सिलाई, कढई, कापणे आणि सोलणे सारखे कार्य करू नये. अशी मान्यता आहे की ग्रहणच्या वेळेस चाकू आणि सुईचा प्रयोग केल्याने गर्भात वाढत असलेल्या शिशूच्या अंगाला नुकसान पोहचू शकत.  
 
चंद्र ग्रहणात करा या मंत्राचा जप  
“ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृत तत्वाय धीमहि तन्नो चन्द्रः प्रचोदयात् ”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती